महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन:

267

ऑरेंज सिटी पार्क येथे 68 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त सामूहिक बुद्धवंदना

Kknews24 नेटवर्क

येरखेडा कामठी येथील ऑरेंज सिटी पार्कातील सभागृहात डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार मंच, लोकविहार यांच्या विद्यमाने बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना 68 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले. या विशेष कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवर, विचारवंत आणि नागरिकांनी उत्स्फूर्त हजेरी लावली.

कार्यक्रमाची सुरुवात सकाळी 10 वाजता सामूहिक बुद्धवंदनेने झाली. उपस्थितांनी एकत्र येऊन तथागत भगवान गौतम बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या तत्त्वज्ञानाचा स्मरण करून श्रद्धांजली वाहिली. या कार्यक्रमाने विचारमंथनाची प्रेरणा देणाऱ्या महामानवाच्या कार्याचा आणि योगदानाचा गौरवपूर्ण वारसा पुढे नेण्याचा निर्धार व्यक्त केला.

कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानिक योगदानाबद्दल तसेच समतेच्या विचारांचा प्रचार व प्रसार करण्याच्या त्यांच्या ध्यासाबद्दल भाष्य केले. सामाजिक ऐक्य, समानता आणि मानवतेच्या विचारांची जपणूक करण्याचा संदेश यानिमित्ताने देण्यात आला.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार मंच, लोकविहारतर्फे आयोजित या कार्यक्रमाचे संयोजन उल्लेखनीय होते. ऑरेंज सिटी पार्क येथील नागरिकांनी या अभिवादन सोहळ्यात सहभागी होऊन महामानवाच्या प्रति आपल्या कृतज्ञतेची भावना व्यक्त केली.
रघुनाथजी उके, प्रा. विशाल बोरकर, वंजारी जी, दत्ताजी राऊत, गौतम गजभिये, बनसोड जी, चंद्रिकापुरे, रमाई महिला मंडळाच्या
अध्यक्ष विद्याताई कासारे . सचिव -किर्तीताई गजभिये , कोषाध्यक्ष -सरोजताई वंजारी , सहसचिव -कविताताई फुले, सदस्य -सुजाताताई उके, वैशालीताई सिरसाट, अश्विनीताई मोहोड, वैद्यताई, शेंडे ताई.रविनाताई गजभिये, वाघमारे ताई, रंजना नारनवरे. ढोकेताई, शीलाताई बंसोड यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.