महात्मा ज्योतिबा फुले हे स्त्री शिक्षणाचे प्रणेते – सुलेखाताई कुंभारे यांचे प्रतिपादन
Kknews24 नेटवर्क
कामठी. महात्मा ज्योतिबा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. महाराष्ट्रातील स्त्री शिक्षणास प्रोत्साहन देऊन भारतातील मुलींची पहिली शाळा १७४८ साली पुणे येथे उघडली. आज वर्तमान काळात मुलांच्या बरोबरीने मुली सुध्दा शिक्षण घेऊन डॉक्टर, इंजीनियर, आय.ए.एस., पायलट, पर्यंत मर्यादित नसुन देशाच्या पंतप्रधान व राष्ट्रपति पदा पर्यंत आसन झालेत. महात्मा ज्योतिबा फुले यांनी ख-या अर्थाने स्त्रीयांकरिता शिक्षणाचे मुहुर्तमेढ रोवून स्त्रीयांना आत्मविश्वासाने व सन्मानाने जगण्याचा मार्ग मोकळा केला. अशा महापुरूषाचा आदर्श सतत आम्हाला प्रेरणादायी असल्याच्या भावना माजी राज्यमंत्री ॲड. सुलेखाताई कुंभारे यांनी व्यक्त केले.
महात्मा ज्योतिबा फुले यांच्या स्मृति दिना निमित्त हरदास शैक्षणिक व सांस्कृतिक संस्थे तर्फे आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. सर्वप्रथम ॲड. सुलेखाताई कुंभारे यांनी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन केले. कार्यक्रमाचे संचालन श्री. दिलीप बोबडे सर यांनी केले. तर प्रास्ताविक हरदास विद्यालय चे मुख्याध्यापक श्री. देवेंद्र जगताप यांनी केले. या कार्यक्रमास विनोद जुमड़े, संजय सुके, प्रफुल वासे, विशाखा पाटील, निशा कापसे, वैशाली अढाऊ, विजय अलोने, अजमत अंसारी व इतर शिक्षक, शिक्षणेत्तर व विद्यार्थी मोठ्या संख्येनी उपस्थित होते.







