Kknews24 नेटवर्क

महाराष्ट्र विधी मंडळासाठी देवेंद्र फडणवीस यांची नियुक्ति झाली, आणि ते आता मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्राचे नेतृत्व करणार. देवेंद्र फडणवीस हे निश्चितच महाराष्ट्राला प्रगती पथावर नेतील व भारतामध्ये क्रमांक १ राज्य म्हणून मान्यता प्राप्त करून देतील असा विश्वास ॲड. सुलेखाताई कुंभारे यांनी व्यक्त केला.

देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असतांना दिक्षा भुमी, ड्रॅगन पॅलेस, चैत्य भुमी, लंडन येथील डॉ. बाबासाहेबांचे निवास स्थान, जपान येथील कोयासन युनिवर्सिटी मध्ये बाबासाहेबांचे शिल्प उभारणे असे अनेक आंबेडकरी चळवळीला अपेक्षीत असलेले काम देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने पुर्ण झालेली आहेत. भविष्यामध्ये सुध्दा निश्चितच दलित, पिढीत, आदिवासी, महिला, युवक, शेतकरी व सर्व समाज घटकांना सामाजिक व आर्थिक प्रगति वर नेण्याकरीता देवेंद्र फडणवीस यांच्या सिंहाचा वाटा राहील अश्या भावना ॲड. सुलेखाताई कुंभारे यांनी व्यक्त केल्या.






