
गावकऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग, विद्यार्थ्यांची प्रभातफेरी व शपथविधी
Kk न्यूज नेटवर्क
कामठी : स्वच्छता ही सेवा अभियानांतर्गत खसाळा येथे ‘एक दिवस – एक तास – एक साथ’ महा श्रमदान उपक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. या उपक्रमाला नागपूर जिल्ह्याचे प्रकल्प संचालक (पाणी स्वच्छता), कुणाल उंदीरवाडे , जिल्हा सल्लागार निखिल रौंदळकर, आशिष रावळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
या अभियानात ग्रामपंचायत खसाळा सरपंच जयश्री धनंजय इंगोले, ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य, महिला वर्ग तसेच गावातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले. श्रमदानाद्वारे गाव परिसर स्वच्छ करण्याचे सामूहिक कार्य करण्यात आले.
यावेळी जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांनी प्रभात फेरी काढून गावात स्वच्छतेबाबत जनजागृती केली. ‘स्वच्छता हीच सेवा, स्वच्छता हीच जबाबदारी’ असा संदेश देत विद्यार्थ्यांनी ग्रामस्थांना प्रेरित केले. यानंतर सर्व उपस्थितांनी स्वच्छतेची शपथ घेऊन गाव स्वच्छ राखण्याचा संकल्प केला.
या महा श्रमदान उपक्रमामुळे ग्रामस्थांमध्ये स्वच्छतेबद्दल जागरूकता वाढून गाव हरित-स्वच्छ करण्याचा दृढ निर्धार निर्माण झाला. यावेळी
जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक तसेच शिक्षक आशा वर्कर अंगणवाडी सेविका पोलीस पाटील आरोग्य केंद्राच्या सी एच ओ तसेच एन एम अशा सर्व विभागाने आणि बचत गटाच्या सीआरपी आणि बचत गटाच्या
असंख्य महिलांनी व पशु सखी यांनी अभियानात सहभाग नोंदवला.






