श्री सदाशिवराव पाटील शिक्षण संस्था द्वारा संचलित स्वामी अवधेशानंद शाळेचा १२ वीचा निकाल १००% :

145

गुणवंत विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवत शाळेचा झेंडा उंचावला!

शिवांग यादव टॉपर, राजश्री, सेजल, ओमकार यांचेही उत्तम प्रदर्शन

कामठी . श्री सदाशिवराव पाटील शिक्षण संस्था द्वारा संचलित स्वामी अवधेशानंद शाळेने २०२४-२५ या शैक्षणिक वर्षात इयत्ता १२ वीच्या परीक्षेमध्ये १००% निकाल देत उज्ज्वल यश संपादन केले आहे. परीक्षेला बसलेल्या सर्व ४१ विद्यार्थ्यांनी यशस्वीपणे उत्तीर्ण होण्याचा अभिमानास्पद विक्रम शाळेने प्रस्थापित केला आहे.

या यशामध्ये पुढील विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक होत आहे –
१) शिवांग यादव – ८८.८३% (शाळेचा टॉपर)
२) अफनान खान – ६८.५०%
३) राजश्री जामकर – ६१.६७%
४) सेजल नाईक – ६०%
५) ओमकार पारेकर – ६०%
६) सेजल रामटेके – ५९.३३%

या विद्यार्थ्यांनी मिळवलेले गुण हे त्यांच्या अथक परिश्रमाचे आणि शिक्षकांच्या मार्गदर्शनाचे फलित आहे. शाळेच्या या अद्वितीय यशाबद्दल संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती किशोरीताई भोयर, उपाध्यक्षा श्रीमती अनुराधाताई भोयर, व सचिव सुरेशजी भोयर यांनी शाळेच्या प्राचार्या डॉ. ईशा मुदलियार, उपप्राचार्य व सर्व शिक्षकवर्गाचे विशेष अभिनंदन केले आहे. तसेच सुषमा गायकवाड, संपा बिश्वास, सीमा फुलझेले, अंकिता साखरकर, हर्षलता बागडे, कविता निंबाळकर, खुशबू राठोड, कृष्णन पिल्ले आदीं शिक्षकांनी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
डॉ. ईशा मुदलियार यांच्या सक्षम नेतृत्वाखाली शाळा सातत्याने प्रगती करत असून, गुणवत्तापूर्ण शिक्षण व विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी संस्थेचे योगदान वाखाणण्याजोगे आहे.