न्यायालयात १६४ प्रकरणे निकाली, ₹९१ लाखांहून अधिक वसुली
Kknews24
न्यूज नेटवर्क
कामठी. तालुका विधी सेवा समिती, कामठी अंतर्गत आज शनिवार दिनांक 14 डिसेंबर रोजी कामठी येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयात राष्ट्रीय लोकअदालत यशस्वीपणे पार पडली. या लोकअदालतीमध्ये दोन पॅनल कार्यरत होती.
पॅनल क्रमांक १ चे अध्यक्ष दिवाणी व फौजदारी न्यायाधीश एम. आर. कामत होते, तर पॅनल क्रमांक २ चे अध्यक्ष न्यायाधीश एस. एस. जाधव होते. पॅनल अॅडव्होकेट म्हणून आर. एन. गणवीर यांनी भूमिका पार पाडली.
लोकअदालतीत न्यायालयात प्रलंबित असलेल्या १६४ प्रकरणांचा निपटारा करण्यात आला. या प्रकरणांतून एकूण ₹१२,१५,५९३/- रुपयांची वसुली करण्यात आली.
तसेच खटला पूर्व प्रकरणांमध्ये (Pre-Litigation) बँक, ग्रामपंचायत, आणि भारतीय दूरसंचार निगमशी संबंधित एकूण २३६१ प्रकरणे मांडण्यात आली. त्यापैकी ३५६ प्रकरणे निकाली निघाली, ज्यातून तब्बल ₹७८,८६,२६४/- रुपयांची वसुली झाली.
तालुका वकील संघातील सर्व वकील, पदाधिकारी, न्यायालयीन कर्मचारी, पोलीस कर्मचारी आणि पक्षकार यांनी लोकअदालतीच्या यशस्वी आयोजनासाठी मोलाचे योगदान दिले.






