
Kknews नेटवर्क
कामठी : भिलगाव (ता. कामठी) येथील
अग्रसेननगर सोसायटीमध्ये शुक्रवारी (दि. ९) सकाळी चारिकेचे आयोजन करण्यात आले होते. यानिमित्त खैरी (बुद्ध विहार) येथील श्रामणेर भन्ते यांचे भिलगाव येथे आगमन होताच उपासक व उपासिकांनी त्यांचे मनोभावे स्वागत केले.
याप्रसंगी घरांसमोर फुलांची
सजावट करण्यात आली होती. भक्तांनी आदरपूर्वक आपल्या घरी अन्न व पाण्याची व्यवस्था करून भन्तेंसाठी सोयी दान केल्या. चारिकेप्रसंगी
वातावरण पूर्णतः भक्तीमय झाले होते. लहानांपासून वृद्धांपर्यंत प्रत्येकाने या कार्यात सहभागी होऊन बौद्ध संस्कार आणि धर्माभिमान व्यक्त केला. याप्रसंगी अश्विन पानतावणे, संविधान लोखंडे, विजय गजभिये, अजय रहाटे, राजेश सोमकुवर, देवकुमार पानतावणे, संगीता वासनिक, रुचिका वासनिक यांच्यासह नागरिक उपस्थित होते. सर्व भन्तेंना देवकुमार पानतावणे यांच्या वतीने भोजनदान करण्यात आले.





