
कामठीत संविधानदिनानिमित्त संगीतमय समाज प्रबोधन व परिसंवाद कार्यक्रम यशस्वी
Kknews24 न्यूज नेटवर्क
कामठी. भारतीय संविधानामुळे या देशातील शोषित,वंचितांना ,जातीय व्यवस्थेच्या गुलामांना चेहरा देऊन त्यांच्यात आत्मसन्मान प्राप्त करून दिला त्यामुळे सामान्य माणसाला लोकशाहीचा राजा बनविण्याची किमया भारतीय संविधानाने मिळाली असे मौलिक प्रतिपादन आंबेडकरी विचारवंत माधुरी वसंतशोभा यांनी कामठी येथील जयस्तंभ चौक ,डॉ बाबासाहेब आंबेडकर परिसरात 26 नोव्हेंबर संविधान दिनाच्या अमृत महोत्सव निमित्त आयोजित भारतीय संविधानाचे 75 वर्षे अमृत महोत्सव विषयावर परिसंवाद कार्यक्रमात व्यक्त केले. याप्रसंगी कार्यक्रमाचे उदघाटक डॉ युगल रायलू यांच्या हस्ते झाले. प्रमुख वक्ते म्हणून डॉ प्रकाश राठोड हे होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष विजय पाटील हे होते. विद्या भिमटे यांनी समयोचित परिसंवादातून संविधानाचा जागर केला.
दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा 26 नोव्हेंबर भारतीय संविधान च्या 75 व्या वर्ष अमृत महोत्सव निमित्त भारतीय संविधान दिन गौरव समिती कामठी च्या वतीने 26 नोव्हेंबर ला जयस्तंभ चौक कामठी येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसर येथे आयोजित संगीतमय
समाजप्रबोधनात्मक कव्वालीचा कार्यक्रम तसेच परिसंवाद कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला.तत्पूर्वी
75 व्या संविधान दिनानिमित्त 26 नोव्हेंबर ला सकाळी 9 वाजता डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास माल्यार्पण करण्यात आले . यावेळी प्रस्ताविकेचे सामूहिक वाचन करण्यात आले त्यानंतर सायंकाळी 4 ते सहा वाजेपर्यंत प्रबोधनात्मक संगीतमय कव्वाली चा कार्यक्रम झाला. त्यानंतर परिसंवाद कार्यक्रमा दरम्यान उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विविध क्षेत्रात सामाजिक बांधिलकी जोपासणारे कामठी तालुक्यातील नामवंतांचा डॉ बाबासाहेब भीमराव समाज क्रांती पुरस्कार,
बाबू हरदास एल एन जयभीम प्रवर्तक पुरस्कार,क्रांतीबा महात्मा ज्योतिबा फुले समाज सेवक पुरस्कार ने सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिवचरण सहारे ,सूत्र संचालन सुधा रंगारी,तर आभार प्रदर्शन मनोहर गणवीर यांनी केले . या कार्यक्रमाला मोठ्या संख्येत नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी भारतीय संविधान दिन गौरव समिती कामठी चे विजय पाटील,मनोहर गणवीर, विद्या भिमटे, शिवचरण सहारे,शालीकराम अडकणे,उमाकांत चिमनकर,दुर्योधन मेश्राम,राजेश ढोके,विकास रंगारी,सुधा रंगारी,बैजनाथ चव्हाण,सुदाम हुमने, निशाताई रामटेके,संजय मेश्राम यासह कामठी महिला संघांनी मोलाची भूमिका बजावली.






