Kknews नेटवर्क
कामठी : येरखेडा (ता. कामठी) येथील लोकविहार
ऑरेंज सिटी पार्कमध्ये वर्षभरापासून अनियमित पाणीपुरवठा केला जात आहे. हल्ली एक दिवसाआड पाणीपुरवठा केला जात असून, पुरेसे पाणी मिळत नसल्याने येथील नागरिक त्रस्त झाले आहेत. ही पाणीसमस्या कायमची सोडवावी, अशी आग्रही मागणी स्थानिक नागरिकांनी नगरपंचायत प्रशासनाकडे केली आहे.
नव्याने वसलेल्या या वसाहतीत ५०० घरे असून, सर्व घरांमध्ये नागरिक वास्तव्याला आहेत. त्यांना वर्षभरापासून पाणीसमस्येला सामोरे जावे लागत आहे. उन्हाळा सुरू होताच एक दिवसाआड पाणीपुरवठा केला जात असून, नळाला पुरेसे पाणी येत नसल्याने त्यांच्या अडचणींमध्ये भर पडली आहे. पाण्याची समस्या दरवर्षी उन्हाळ्यात उद्भवत असली तरी यावर्षी ती लवकर निर्माण झाली, अशी माहिती नागरिकांनी दिली.
ही समस्या सोडविण्यासाठी आपण आधीच्या ग्रामपंचायत आणि आताच्या नगरपंचायत प्रशासनाला अनेकदा निवेदने दिली. परंतु, प्रशासनाने आमची मागणी गांभीर्याने घेतली नाही, असा आरोप नागरिकांनी केला आहे. दरम्यान, येरखेडा नगरपंचायतीचे प्रशासकीय
पाणी साठवायचे कशात ?
वेळेवर नळ येत नसल्याने तसेच अपुरे पाणी मिळत असल्याने ते साठवून ठेवावे लागते. आपल्याकडे पाणी साठवून ठेवण्याची सोय नसल्याने अडचणी येतात. पाण्याचा टँकर बोलावल्यास पाणी कशात साठवून ठेवण्याचे, असा प्रश्न पडतो. परिसरात विहिरी अथवा बोअरवेल नसल्याने पूर्णपणे नळाच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागते, अशी माहिती या वसाहतीतील गृहिणींनी दिली.
वर्षभरापासून अनियमित : समस्या पाणीपुरवठा सोडविण्याची आग्रही मागणी
अधिकारी अमर हांडा यांनी नुकतीच एक विशेष बैठक बोलावली होती. या बैठकीला लोकविहार ऑरेंज सिटी पार्कमधील नागरिक उपस्थित होते. अमर हांडा यांनी नागरिकांच्या समस्या ऐकून घेतल्या. या वसाहतीला पूर्ण क्षमतेने पाणीपुरवठा करण्याच्या सूचना त्यांनी संबंधित विभागाच्या कर्मचाऱ्यांना दिल्या. पाण्याच्या ठरलेल्या वेळेत सुधारणा केली जाणार असून, नियमित पाणीपुरवठा करण्याची ग्वाही त्यांनी नागरिकांना दिली. नवीन टाकीचे काम पूर्ण होऊन कार्यान्वित होताच रोज पाणीपुरवठा केला जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. बैठकीला विशाल बोरकर, शिशिर मेश्राम, प्रभुदास देसाई, सचिन गेडाम, विनोद वैद्य, राजीव जयस्वाल यांच्यासह नागरिक उपस्थित होते.






